नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत त्याने छाप सोडली. संघाच्या विजयानंतर, व्हाईट ब्लेझरमधील याचे सेलिब्रेशन खास ठरले.
दरम्यान, हार्दिकने न्यूझिलंडविरुद्धच्या विजयानंतर ट्रॉफीसह खेळपट्टीवर आयकॉनिक पोज दिली. अक्षर पटेलने काढलेला हा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आणि अवघ्या ६ मिनिटांत १ मिलियन लाईक्स मिळवले.
याआधी, कमी वेळात १ मिलियन लाईक्स मिळवण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता, जो त्याने २०२४ च्या वर्ल्ड कप विजयानंतर ७ मिनिटांत मिळवला होता.
हार्दिक पांड्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याचे इन्स्टाग्रामवर ३८.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. तो अनेकदा स्टायलिश फोटो आणि महागड्या जीवनशैलीची झलक दाखवत असतो.