कठोर कारवाईसाठी भारतीय लष्कराला सूट : मिस्री
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
युद्धबंदी झाल्यानंतरही सीमेपलिकडून गोळीबार सुरू आहे. अवघ्या काही तासांतच पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. ही अतिशय निंदनीय आणि गंभीर गोष्ट आहे. पाकिस्तानने ही गोष्ट गंभीरपणे घ्यावी आणि योग्य ती कार्यवाही करून गोळीबार थांबवावा. या उलट भारतीय सैन्याला कडक पावले उचलण्याचे आदेशही दिल्याचे असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले.
युद्धबंदी करार मान्य करून युद्ध थांबविण्याचा निर्णय घेतला असतानाही शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत पाकिस्तानी सेनेने जम्मू, राजस्थान, पंजाब या सीमाभागातील राज्यांवर हवाई हल्ले केले. या सर्व घडामोडीनंतर आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही अतिक्रमणाचा सामना करण्यासाठी ठोस आणि कठोर पाऊल उचलण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यासाठी भारतीय लष्कराला थेट कारवाईची मुभा दिली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव मिस्त्री यांनी सांगितले.
हल्ले रोखण्यासाठी
ठोस कार्यवाही करा
भारतीय सेना प्रत्युत्तर देत आहे. सीमेवर होत असलेले अतिक्रमण अत्यंत निंदनीय आहे. यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे. पाकिस्तानने या स्थितीला व्यवस्थितपणे समजून घेतले पाहिजे आणि हल्ले रोखण्यासाठी लवकर कारवाई करावी, अशी भारताची भूमिका आहे, असे मिस्त्री म्हणाले.