32.8 C
Latur
Saturday, April 26, 2025
Homeमुख्य बातम्यापाकचे ‘नापाक’ षडयंत्र : जम्मू-काश्मिरमध्ये हाय अलर्ट; काश्मिरी पंडितांसह रेल्वे टार्गेट

पाकचे ‘नापाक’ षडयंत्र : जम्मू-काश्मिरमध्ये हाय अलर्ट; काश्मिरी पंडितांसह रेल्वे टार्गेट

श्रीनगर : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी राज्यभर हाय अलर्ट जाहीर केला आहे. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचत आहे. या कटात खो-यात दहशतवाद्यांची घुसखोरी, रेल्वे मालमत्तेवर हल्ला, काश्मिरी पंडित आणि बिगर काश्मिरी नागरिकांवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गुप्तचर माहितीच्या आधारे, जम्मू-काश्मीरच्या उत्तर, मध्य आणि दक्षिण भागात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. विशेषत: राजौरी, पुंछ, डोडा, किश्तवार, सुंदरबनी, नौशेरा, लांबेरी, अखनूर आणि डोमाना या संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. सुरक्षा दलांना सतर्क राहण्याच्या आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचे नापाक कारस्थान आखत आहे. त्यामुळे पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या कानाकोप-यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. ‘आयएसआय’ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमधील तरुणांना दहशतवादाकडे भडकवण्याचा प्रयत्न सुरु करत असल्याचे देखील समजते. याशिवाय आयएसआयने जमात-ए-इस्लामीच्या नेत्यांना लक्ष्य करण्याची योजना आखली आहे. पाकिस्तानी सीमेवर ड्रोन कारवायांमध्येही वाढ झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR