नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगात एक कर्मचारी केक घेऊन जाताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे भारतातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, राजकीय वर्तुळातही तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगात एक कर्मचारी केक घेऊन जाताना दिसला आहे. ज्यामुळं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. जावेळी हा कर्मचारी केक घेऊन जात होता, त्यावेळी माध्यमांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या कर्मचा-याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. हा केक नेमका कोणता आनंद साजरा करण्यासाठी घेऊन जात आहेत असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. मात्र, त्याने यावर कोणतही उत्तर दिले नाही. पाकिस्तान दूतावासात केक नेण्याबाबत अनेक प्रकारचे अंदाज लावले जात आहेत. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला, त्या हल्ल्यामुळे पाकिस्तान खूश असल्याचं बोललं जात आहे. तसेच या हल्ल्यामागे पाकिस्तानच असल्याचे सांगितले जात आहे. सत्य काहीही असले तरी पाकिस्तानी कर्मचा-याने उत्तर देण्याचे टाळल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.