26.7 C
Latur
Friday, May 9, 2025
Homeअंतरराष्ट्रीयपाकिस्तानचे पुन्हा ड्रोन हल्ले

पाकिस्तानचे पुन्हा ड्रोन हल्ले

कुरापती सुरूच, भारताने मनसुबे उधळले

सीमा भागात अनेक
ठिकाणी ब्लॅकआऊट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ऑपरेशन सिंदूरनंतर चवताळलेल्या पाकिस्तानने शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा भारतातील सीमेलगतच्या विविध शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. उत्तरेतील बारामुल्लासह दक्षिणेला भुजपर्यंत जवळपास २६ ठिकाणी पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले. तसेच क्षेपणास्त्रांचाही मारा केला. परंतु भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावले. सीमेलगत बॉम्बगोळा आणि स्फोटांच्या आवाजांनी घबराट पसरली आहे.

भारताच्या ड्रोन हल्ल्याला भारताने गुरुवारी रात्रभर थेट इस्लामाबादपर्यंत ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले करून पाकिस्तानची झोप उडविली होती. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी रात्री पाकिस्तानने सीमेलगत काश्मिरात जम्मू, सांबा, बारामुल्ला, फिरोजपूर, नागरोटा, पठाणकोट, फझिल्का, लालगड जट्टा, जैसलमेर, बाडमेर, भूज, कौरबेत आणि लाखी नाला आदी ठिकाणी पाकिस्तानने ड्रोनचा मारा केला. फिरोजपूरमध्ये ड्रोन हल्ल्यात एका स्थानिक कुटुंबातील काही सदस्य जखमी झाले. त्यावेळी ब्लॅकआऊट करून भारतानेही पाकिस्तानी हल्ल्याला प्रत्युत्तर देत बरेच हल्ले परतवून लावले.

पठाणकोट, अमृतसरमध्येही क्षेपणास्त्र पाडले. दरम्यान, जम्मू विमानतळावर सायरन वाजू लागले. तसेच अनेक ठिकाणी स्फोटाचेही आवाज आले. अमृतसर आणि जैसेलमेर या शहरांवर पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला. या दोन्ही ठिकाणचे हल्ले भारताने परतवून लावले. अमृतसरमध्येही स्फोटाचे आवाज येत असल्याने ब्लॅकआऊट करण्यात आले. जैसलमेरमध्ये पाकिस्तानचे ४ ड्रोन भारताने पाडले. दरम्यान, राजस्थानच्या बडनेरमध्येही संपूर्ण ब्लॅकआऊट करण्यात आला. जम्मू, सांबा आणि पठाणकोटमध्ये ड्रोन दिसल्याची पुष्टी झाली. सुरक्षा दलांनी या ड्रोन हालचालींवर तात्काळ कारवाई केली आणि त्यांना निष्क्रिय केले. संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला.

उरी, कुपवाडामध्ये गोळीबार
उरी, नौगाम हंदवाडा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू झाला. त्याला भारताकडून प्रत्युत्तर देण्यात आले. त्यामुळे सीमावर्ती भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानने पूँछ आणि कुपवाडा सेक्टरमध्येही गोळीबार केला.

पाकिस्तानचे ड्रोन हवेतच नष्ट
पाकिस्तानने अवंतीपुरा हवाई दल तळावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने ते हवेतच नष्ट केले. पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आले तेव्हा १५-२० स्फोटांचे आवाज ऐकू आले.

तरणतारणमध्ये चार
हल्ले हाणून पाडले
पंजाबमध्ये गुरुदासपूर, जालंधर, पठाणकोटसह अनेक जिल्ह्यांत पाकिस्तानने शुक्रवारी रात्री पुन्हा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याचा मारा केला. फरीदकोटमध्येही स्फोटांचे आवाज झाले. तरणतारणमध्ये चार क्षेपणास्त्र हल्ले झाले. हे चारही हल्ले भारतीय हवाई दलाने हाणून पाडले. तसेच पठाणकोट आणि अमृतसरमध्येही ड्रोन नष्ट केले. याशिवाय जैसलमेरमध्ये ४ ड्रोन हवेतल्या हवेत नष्ट केले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR