बिजींग : वृत्तसंस्था
टेरिफ वॉरने शत्रू देशांना मित्र बनविण्यास सुरुवात केली आहे तर मित्र देशांना शत्रू बनविण्यास सुरुवात केली आहे. टेरिफ वॉरमुळे अमेरिका आणि चीनमध्ये मोठी स्पर्धा सुरु झालेली आहे. अशातच पाकिस्तान आणि चीनमधील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. नुकतीच अशी मोठी घटना घडली असून चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी त्या रागातून आपला पाकिस्तान दौरा रद्द केला आहे.
पाकिस्तानी सैन्य चीनसोबत डबलगेम खेळत आहे. खैबर पख्तूख्वा भागात दुर्मिळ खनिज साठे मिळाले आहेत. चीन या भागात त्याचा शोध घेत आहे. परंतू पाकिस्तानी सैन्याने या खनिजांचे साठे हाती लागताच चीनला बाजुला करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. यामुळे पाकिस्तानवर चीन नाराज झाला आहे. चीनने अब्जावधी डॉलर पाकिस्तानमध्ये गुंतविलेले आहेत. कोबाल्ट सारखी खनिजे तिथे सापडत आहेत. अमेरिकेने युक्रेनवर युद्ध हरण्याची भीती दाखवून तेथील खनिज साठ्यांचा ताबा घेतला आहे. तसेच चीनलाही हवे आहे.
पाकिस्तानी सैन्याचे लष्करप्रमुख या खनिजांच्या क्षेत्रात अमेरिकेलाही भागीदार करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे चीन भडकला असून चिनी राष्ट्राध्यक्षांसह अन्य चिनी उच्च अधिका-यांचे दौरे रद्द करण्यात आले आहेत. पाकिस्तानी सैन्याला अमेरिकेशी संधान साधायचे असेल तर आधी त्यांनी आम्ही दिलेले अब्जावधी डॉलर्सचे कर्ज चुकते करावे, असे स्पष्टपणे चीनने म्हटले आहे.
बलुचिस्तानमधील ग्वादर बंदरात प्रवेश आणि बांधकाम करण्यासाठी चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर बांधत आहेत. चीनने यासाठी ६२ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. बलुचिस्तानातील हल्ले पाहता चीनला त्यांचा पैसा बुडत असल्याचे वाटत आहे, असेही रझा म्हणाले.