जळकोट : ओमकार सोनटक्के
जळकोट तालुक्यामध्ये यावर्षी अतिशय कमी पाऊस पडल्यामुळे तालुक्यावर आगामी काळात भीषण पाणीटंचाईचे सावट आहे. येणा-या काळात तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाई जाणवू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाई निवारणार्थ आराखडा तयार करण्यात आला असून तालुक्यासाठी जानेवारी २०२४ ते जून २०२४ या कालावधीसाठी तीन कोटी ९० लाख रुपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती टंचाई कक्ष प्रमुख सचिन काडवादे यांनी दिली.
१ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत एक कोटी २८ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये गावे व वाड्यांची तसेच तांड्यांची संख्या ६७ असून टँकर व बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी २९ लाख, खाजगी विहीर ंिवधन विहीर अधिग्रहण करणे ४३ लाख ७४ हजार रुपये, ंिवधन विहिरी घेणे अठरा लाख ६० हजार रुपये, नळ योजना विशेष दुरुस्ती करणे ३२ लाख, वीर कुलकर्णी तसेच गाळ काढणे पाच लाख रुपये .तर १ एप्रिल २०२४ ते ३० जून २०२४ पर्यंत दोन कोटी ६२ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे यामध्ये टँकर तसेच बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी दोन कोटी १७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर खाजगी विहीर व ंिवधन विहीर अधिकृत करण्यासाठी ४४ लाख २८ हजार रुपयाची तरतूद करण्यात आली आहे, अशी एकूण दोन कोटी ६२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे .
जळकोट, पाटोदा बुद्रुक, करंजी, लाळी बुद्रुक, सोनवळा, कोळनुर, पाटोदा खुर्द ,माळहिप्परगा, हळद वाढवणा, रावण कोळा, मरसांगवी, डोंगरगाव, तिरुका, घोणसी, धोंडवाडी, सुल्लाळी तांडा, सुलाळी,चिंंचोली, अतनूर, अतनूर तांडा, शेंलदरा, स्वर्गा, वडगाव, होकर्णा, उमरदरा, केकतंिसंदगी, वांजरवाडा, चेरा, उमरगा रेतू, जगलपूर, डोमगाव, धामणगाव, जिरगा, हावरगा-, येलदरा, ढोर सांगवी, विराळ, कुणकी, गव्हाण्, मेवापुर, शिवाजीनगर तांडा, शिवाजीनगर, गुत्ती, रामपूर तांडा, अग्रवाल तांडा, एवरी, बेळसांगवी, लाळी खुर्द ,मंगरूळ, डोंगर कोणाळी, बोरगाव खुर्द, एकुरका खुर्द, करंजी, सोनवळा या गावासह ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या वाडी तसेच तांड्यांसाठी पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
जळकोट येथील गटविकास अधिकारी नरेंद्र मेढेवार यांनी जळकोट पंचायत समितीत तालुकास्तरीय पाणीटंचाई निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये त्यांचा एक कक्ष प्रमुख म्हणून सहाय्यक प्रशासनाधिकारी सचिन काडवादे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर कक्ष प्रमुख यांचे सहाय्यक म्हणून घोरपडे एस. के. कनिष्ठ सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वांजरवाडा गन व जबलपूर गणातील गावासाठी क्षेत्रीय अधिकारी म्हणून कनिष्ठ अभियंता शेळके एस. जी. यांची तर माळहीपरगा गण व मंगरूळ गण अंतर्गत येणा-या गावासाठी क्षेत्रीय अधिकारी म्हणून शाखा अभियंता मठपती व्ही .के यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच घोनसी व अतनूर येथील गणातील गावासाठी कनिष्ठ अभियंता माने व्ही . जी नेमणूक करण्यात आली आहे. या क्षेत्रीय अधिका-यांनी टंचाई काळामध्ये प्राप्त प्रस्तावावर वेळीच कारवाई करून अहवाल तालुकास्तरीय कक्ष प्रमुखांना सादर करावयाचा आहे.