36.5 C
Latur
Thursday, April 24, 2025
Homeलातूरपाण्याचा पिवळसरपणा कमी झाल्याचा मनपा प्रशासनाचा दावा

पाण्याचा पिवळसरपणा कमी झाल्याचा मनपा प्रशासनाचा दावा

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याचे शुद्धीकरण करुन नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जात असल्याची माहिती मनपाच्या वतीने देण्यात आली. तसेच पाण्याचा पिवळसरपणाही कमी झल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे.
लातूर शहराला धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. धरणातून उचललेले पाणी हरंगूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. पाटबंधारे विभागाच्या वतीने सध्या कॅनलच्या माध्यमातून पाण्याचे वितरण केले जात आहे. तसेच सध्या तापमानही वाढलेले आहे. तापमानामुळे पाण्याची पातळी घटत असून पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे शेवाळ निर्मितीची प्रक्रिया जलद गतीने होते. हे पाणी क्लोरीनच्या सानिध्यात आल्यानंतर काही वेळा त्याचा रंग पिवळसर होतो. मनपाच्या वतीने हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात ब्लिचिंग पावडर, तुरटी, क्लोरीन गॅस तसेच पीएसी पावडरचा वापर करुन पाणी शुद्ध केले जाते. पाण्याचा पिवळसरपणा कमी केला जातो. हेच पाणी शहरात पुरवठा केले जात आहे.
मांजरा धरणातून पाणीपुरवठा होणा-या सर्वच शहरांमध्ये सध्याही समस्या जाणवत असून लातूर शहर महानगरपालिकेने निरी या संस्थेने सुचवलेल्या उपायोजना अमलात आणल्या असून सद्यस्थितीत शहरात नळाला येणारे पाणी शुद्ध आहे. या पाण्याची जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडून दैनंदिन तपासणी केली जाते. नळाला येणारे पाणी पिण्यासाठी योग्य असून त्यामुळे आरोग्याला काहीही धोका नाही, असेही लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने नमुद केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR