27.7 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरपानचिंचोली महसूल मंडळात सोयाबीनचे मोठे नुकसान

पानचिंचोली महसूल मंडळात सोयाबीनचे मोठे नुकसान

शिवणी कोतल : वार्ताहर
निलंगा तालुक्यातील शिवणी कोतल, वडगाव, तुपडी, आनंदवाडी,राठोडा, आंबेगाव, शेडोळ, हाडगा परिसरात गेल्या तीन ते चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे काढणीला आलेले सोयाबीन वाया जाण्याची भीती शेतक-यातून व्यक्त होत आहे .
  शिवणी कोतल परिसरात या वर्षी सर्वाधिक पाऊस पडल्याने आधीच सोयाबीन सह तुर, मुग, उडीद पिकांचे नुकसान झाले यातुनच सोयाबीन थोडे बहुत निघेल अशी अपेक्षा असताना मात्र तीन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅंिटग सुरू असल्याने सोयाबीनच्या टोकापर्यंत पाणी थांबल्याने सोयाबीनला परत कोंब फुटू लागले आहे व शिल्लक राहिलेल्या सोयाबीनची नासाडी होण्यास सुरुवात झाली आहे.
    पिक विमा कंपनी मालामाल तर शेतकरी देशोधडीला लागण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या वर्षी फक्त पंचवीस टक्के मदत करण्यात कंपनीने धन्यता मानली. आता परत पंचवीस टक्यातच कंपनी गाशा गुंडाळणार असे दिसत आहे.  एकीकडे सोयाबीनचे आतोनात नुकसान झाले असताना. विमा कंपनीमार्फत  अद्याप अर्धाही नुकसानीचा सर्वे झालेला नाही. शेतक-यांंनी कंपनी कडे तक्रार देऊनही फक्त काही बोटावर मोजण्याइतकेच शेतक-यांचा सर्वे झाला आहे.  आता शेतक-यांंकडून शासनदरबारी ८ हजार पाचशे हमी भाव द्यावा ही मागणी जोर धरू लागली आहे. कारण शेतक-यांंचे उत्पादन या वर्षी मोठ्या प्रमाणात घटणार आहे. आता शासनाने सरसकट पंचनामे करून मदत करावी अशी शेतक-यांतून  मागणी होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR