15.6 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeमहाराष्ट्रपानसरे हत्येबाबत हायकोर्टाचा हस्तक्षेपास नकार

पानसरे हत्येबाबत हायकोर्टाचा हस्तक्षेपास नकार

कुटुंबीयांची याचिका निकाली
मुंबई : प्रतिनिधी
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात आता हायकोर्टाच्या हस्तक्षेपाची गरज नाही, असे म्हणत पानसरे कुटुंबियांनी दाखल केलेली याचिका हायकोर्टाकडून निकाली काढण्यात आली आहे. मात्र साल २०१६ पासून कोल्हापूर सत्र न्यायालयात सुरू असलेला खटला दररोज सुनावणी घेत लवकरात लवकर निकाली काढण्याचे आदेश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत.

या प्रकरणी हायकोर्टाच्या हस्तक्षेपाची गरज नसल्याचा दावा करत आरोपींनी दाखल केलेल्या याचिकाही हायकोर्टाकडून निकाली काढण्यात आल्या. कम्युनिस्ट पक्षाचे नेते गोविंद पानसरे यांची १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापुरातील राहत्या घरात गोळ््या झाडून हत्या करण्यात आली होती. राज्य सरकारने एसआयटी स्थापन करत या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. मात्र कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा छडा लागेपर्यंत याप्रकरणी तपासयंत्रणेला कोणतेही यश आलेले नव्हते. गौरी लंकेश प्रकरणी कर्नाटक एटीएसने महाराष्ट्रात येऊन आरोपींना अटक केल्यानंतर दाभोलकर-पानसरे हत्याकांडातील आरोपी एकच असल्याचे समोर आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR