पालघर : पालघर जिल्ह्याला सोमवारी पहाटे ३.७ रिश्टर स्केलचा धक्का बसला, अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे. यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही, असे त्यांनी सांगितले.
डहाणू तालुक्यात पहाटे भूकंपाची नोंद झाली, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख विवेकानंद कदम यांनी अधिकृत अहवालाचा हवाला देत सांगितले.
तालुक्यातील बोर्डी, दापचरी, तलासरी भागातील नागरिकांना पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी नागरिक भीतीपोटी घराबाहेर पडले होते. जिल्ह्यात यापूर्वी अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.