23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रपावसात भिडणा-या चिमुकलीला काढून दिले जॅकेट

पावसात भिडणा-या चिमुकलीला काढून दिले जॅकेट

शाहू महाराज छत्रपतींनी विशाळगडावर दिले मायेची ऊब
कोल्हापूर : प्रतिनिधी
राजर्षि शाहू महाराजांचा वारसा हा छत्रपतींच्या रक्तातच आहे, हे आज कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या एका कृतीने अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिले. विशाळगड अतिक्रमण मोहिमेतून झालेल्या हिंसाचारावर परखड भूमिका घेत स्वत:च्या पुत्राचा, संभाजीराजे छत्रपतींचा जाहीर निषेध नोंदवत शाहू महाराज छत्रपतींनी सर्वांची मने जिंकली. त्यानंतर आज विशाळगडावरील भेटीदरम्यान भरपावसात भिजत असलेल्या चिमुकलीला पाहून आपल्या अंगावरील जॅकेट शाहू छत्रपतींनी काढून त्या चिमुकलीच्या अंगावर घातले. महाराजांनी मायेची ऊब चिमुकलीला दिल्यानंतर तिच्या चेह-यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता.

विशाळगडावरील पाहणीदरम्यान गजापूर या ठिकाणी गेल्यानंतर शाहू महाराजांनी स्वत:च्या अंगावरील जॅकेट काढून चिमुकलीच्या अंगावर चढवले. जोरदार वारा आणि पाऊस पडत असताना गजापुरातील महिला, चिमुकली मुले शाहू महाराजांना भेटून कालची घटना सांगत होते. त्यावेळी पावसात भिजणारी आणि कुडकुडणारी चिमकुली पाहून महाराजांनी नकळत आपल्या अंगावरील जॅकेट काढले अन् चिमुकलीला मायेची ऊब म्हणून परिधान केले. शाहू महाराजांच्या या कृतीने उपस्थितही गहिवरले.

विशाळगडावर भेट
देऊन केली पाहणी
विशाळगड परिसरातील जिल्हा प्रशासनाच्या कारवाईनंतर कोल्हापूरमधील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. शाहू महाराज यांचे पुत्र संभाजीराजे यांनी गेल्या काही दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर संभाजीराजे छत्रपती विशाळगडाच्या परिसरात गेले, तेव्हा काही जणांचा जमाव हिंसक झाला होता आणि त्यांनी विशाळगडाच्या परिसरात तोडफोड केली होती. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी नुकसानग्रस्तांची पाहणी केली होती. या भेटीत शाहू महाराजांनी विशाळगडावरील मुस्लिम बांधवांची भेट घेऊन त्यांचे सांत्वनही केले. किल्ले विशाळगड परिसरातील हिंसाचारग्रस्त गजापूर गावास भेट देऊन पाहणी केली. किल्ले विशाळगड येथील अतिक्रमणाशी संबंध नसलेल्या गजापूर गावात घडलेली हिंसाचाराची घटना अतिशय दुर्दैवी असून धर्मांधतेच्या राजकारणापासून दूर राहून कोल्हापूरकर बंधुत्वाची भावना जोपासत संपूर्ण देशासमोर अनुकरणीय आदर्श ठेवतील, याची खात्री आहे, असे शाहू महाराज म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR