23.7 C
Latur
Tuesday, July 2, 2024
Homeलातूरपावसाळ्यात जिल्ह्यात ४१ टँकर सुरू

पावसाळ्यात जिल्ह्यात ४१ टँकर सुरू

लातूर : प्रतिनिधी

जिल्हयात पावसाळा सुरू झाला तरी अद्याप जिल्हयातील ३१ मधील १ लाख १ हजार ८२७ लोकसंख्येला ४१ शासकीय व खाजगी टँकरच्याद्वारे पाणी पुरवठा होत आहे. सार्वजनीक स्त्रोतांना पाणी वाढण्यासाठी जिल्हयात दमदार पावसाची गरज आहे. जो पर्यंत चांगला पाऊस होत नाही. तो पर्यंत नागरीकांना टँकर व अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार आहे.

लातूर जिल्हयात ब-याच ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस होत आहे. कांही ठिकाणी नदी, नाल्यांना पाणी आले. ज्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला तेथे शेतकरी पेरणी करताना दिसून येत आहेत. मात्र पाऊस पडण्याचे प्रमाण वाढून जमिनीमध्ये मरून ते सार्वजनीक पाण्याच्या स्त्रोता पर्यंत जाण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे जिल्हयात आणखी दमदार पासवाची गरज आहे. गेल्यावर्षी जिल्हयात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने यावर्षी जानेवारीपासूनच ग्रामीण भागातील नागरीकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागले. एप्रिल व मे महिण्यातही पाणी टंचाईच्या झळा दिवसेंदिवस वाढत्याच राहिल्या. सध्या पाऊस पडत असला तरी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अद्याप कोरडेच आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाला अद्याप पाणी टंचाई जाणवत आहे.

जिल्हयातील ३१ गावे, वाडयांना ४१ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यात सर्वाधिक लातूर तालुक्यात सर्वाधिक १३ टँकरने पाणी पुरवठा होत आहे. यात बोरगाव, साखरा, चिंचोली ब., चिकूर्डा, गुंफावाडी, रामेगाव, रूई दिंडेगाव, शिराळा, येळी, महापूर तांडा, भडी या गावांचा समावेश आहे. तसेच औसा तालुक्यातील लामजाना, खरोसा, मोगरगा, टाका, तांबारवाडी, राजेवाडी, कार्ला, शिवणी लखवाडी, रामेगाव, मासूर्डी गावे, वाडयांना १० टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे.

अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णी, ब्रम्हवाडी (सिंदगी बु.), हसर्णी, किनगाव, सिरसाटवाडी, मोळवणवाडी, सोनवणेवाडी, चाटेवाडी, हंगेवाडी येथे ६ टॅकरद्वारे पाणी, जळकोट तालुक्यातील शिवाजी नगर तांडा, वाघमारी तांडा, येलदरा, डोमगाव, शेलदरा, उमरगा रेतू, पोमा तांडा, फकरू तांडा, गोविंद तांडा, वांजरवाडा येथे ७ टँकरद्वारे पाणी पुरवठा, उदगीर तालुक्यात डोंगरशेळकी, महादेववाडी, बामाजीचीवाडी, जायबाचीवाडी येथे ३ टँकरद्वारे पाणीपुरवठा, तसेच रेणापूर तालुक्यातील सेलू खू, मोहगाव येथे २ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR