पुणे : प्रतिनिधी
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत कमी अधिक प्रमाणात मतदारांचा उत्साह दिसत होता पहिल्या चार तासात मतदानाची टक्केवारी कमी असल्याचे पाहायला मिळाले. दुपारनंतर मतदानाचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले.
शुक्रवारी सकाळी मतमोजणीस सुरुवात होऊन संध्याकाळपर्यंत निकाल जाहीर होण्याचा अंदाज आहे. दुपारी साडे तीन पर्यंत पुणे महानगर पालिकेसाठी ३६ टक्के आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेसाठी ४० टक्के मतदान झाले आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळच्या पहिल्या दोन तासात ६.३७ टक्के तर साडेअकरा पर्यत १४.९२ टक्के मतदान तर दुपारी दीड पर्यंत २६.२८ टक्के मतदान झाले होते.तसेच दुपारी साडे तीन पर्यंत ३६.९५ टक्के मतदान झाले होते.सकाळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ,विधान परिषद उपसभापती डॉ नीलम र्गोहे यांनी मतदानाचा हक्कं बजावला.सकाळच्या काही तासात शहराच्या मध्यवस्तीमधील मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह दिसत होता अनेक भागात रांगा लागलेल्या पहावयास मिळाले तर उपनगरात मतदारांचे प्रमाण कमी दिसत होते.
पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकीसाठी दुपारी दीड पर्यंत २८.१५ टक्के तर दुपारी साडेतीन पर्यत ४०.५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती मिळाली आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी तब्बल ९ वर्षांनंतर निवडणूक होत आहे एकूण १२८ पैकी १२६ जागांसाठी मतदान पार पडले.एकूण ६९७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.मतदार संख्या १७ लाख १६ हजार ८९१ इतकी आहे.
काही मतदान केंद्रातील ई व्ही एम यंत्रामध्ये बिघाड झाल्याची तक्रार करण्यात आली.त्यामुळे अशा मतदान केंद्रावर अतिरिक्त यंत्राची उपलब्धता करण्यात आली.

