29.4 C
Latur
Monday, July 21, 2025
Homeलातूरपिक विमा भरण्याकडे शेतक-यांचा निरऊत्साह

पिक विमा भरण्याकडे शेतक-यांचा निरऊत्साह

लातूर : प्रतिनिधी
या वर्षापासूनच्या खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत बदल झाले आहेत. गेल्यावर्षी १ रूपयात पिक विमा भरण्याची सोय यावर्षापासून बंद झाल्याने खरीप हंगामातील पिक विमा भरण्याकडे शेतक-यांच्या फारसा कल दिसून येत नाही. पिक विमा भरण्यासाठी अजून १० दिवस शिल्लक आहेत. असे असले तरी आज पर्यंत केवळ १ लाख ७९ हजार ५३८ शेतक-यांनी खरीपाचा पिक विमा भरला आहे. या योजनेअंतर्गत शेतक-यांना अधिसूचित पिकांसाठी विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत आहे.
लातूर जिल्हयात ११३.१ मिली मिटर म्हणजेच ४७.५ टक्के पाऊस झाला आहे. या पावसाच्या आधारावरच शेतक-यांनी ५ लाख ६३ हजार ८५० हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या उरकल्या आहेत. यात ४ लाख ६४ हजार ३९६ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे.  ६८ हजार ३३७ हेक्टरवर तूर, ७ हजार ८३ हेक्टरवर मूग, ५ हजार ९३१ हेक्टरवर उडीद, २ हजार ६७६ हेक्टरवर ज्वारी, ८८ हेक्टरवर बाजरी, १ हजार ८८७ हेक्टरवर मका, साळ ५७.६ हेक्टवर, १६६.२ हेक्टरवर तिळ, १३८ हेक्टरवर भूईमुग, सुर्यफूल १ हेक्टर, लहान कारळे २१ हेक्टर अशा प्रकारे ९६.२ टक्के क्षेत्रावर खरीपाचा पेरा झाला आहे. मात्र या पिकांच्या वाढीसाठी जिल्हयात दमदार पावसाची गरज गाहे.
जिल्हयात ५ लाख ६३ हजार ८५० हेक्टरवर शेतक-यांनी खरीपाच्या पेरण्या उरकल्या असून पडणा-या पावसाची अनिश्चितता पाहता पिकांना पिक विम्याचे संरक्षण असणे आवश्यक आहे. मात्र शासनाने शासनाने २०२५-२६ या वर्षापासून प्रधानमंत्री पिक विमा योजनेत बदल केला असून १ रूपयात पिक विमा भरण्याची पध्दत बंद केली  आहे.  पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पिक पाहणी आणि फार्मर आयडी अनिवार्य आहे. ही योजना लातूर जिल्ह्यातील अधिसूचित मंडळांमधील अधिसूचित पिकांसाठी लागू असून, कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतक-यांसाठी ऐच्छिक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR