31.7 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeलातूरपीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता लवकरच जमा होणार 

पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता लवकरच जमा होणार 

लातूर : प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणा-या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १६ वा हप्ता जानेवारी महिन्याच्या अखेरीस वितरित करण्याचे शासनाचे नियोजन आहे. दरम्यान, या योजनेच्या लाभासाठी नोंदणी, ई-केवासी, बँक खाते आधार क्रमांकास जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करुन घेत निकषांची पूर्तता करणे महत्वाचे आहे.
शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची पूर्तता केलेल्या शेतक-यांना योजनेचा लाभ दिला जातो. दरम्यान, पीएम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचा लाभ जानेवारीच्या शेवटी वितरित करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभासाठी नोंदणी, ई-केवायसी, बँक खाते आधार क्रमांकास जोडणे, अशा बाबींची पूर्तता शेतक-यांनी करुन घेणे आवश्यक आहे. पीएम किसान योजनेच्या निकषांची पूर्तता करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.  पीएम किसान योजनेंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटूंबास दोन हजार रुपये याप्रमाणे तीन समान हप्त्यात दरवर्षी सहा हजार रुपये लाभ देण्यात येत आहे. लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाते आधार संलग्न व योजनेचे ई-केवायसी पूर्ण केलेले शेतकरी कुटूूंब या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.
राज्याच्या भूमिअभिलेख नोंदीनूसार जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या बँक खाती आधार  संलग्न व ई-केवायसी न केलेल्या शेतक-यांना योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी केंद्र शासनाने ६ डिसेंबर २०२३ ते १५ जानेवारी या कालावधीत गावपातळीवर ४५ दिवसांची विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने कृषी आयुक्त डॉ. प्रवीण  गेडाम यांनी राज्यातील पात्र शेतक-यांना पीएम किसान योजनेत समाविष्ट करण्यासाठी महसूल, ग्रामविकास व कृषी विभागांना या विशेष मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR