26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरपीकविमा, सोयाबीनला हमी भाव द्या

पीकविमा, सोयाबीनला हमी भाव द्या

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
शेतक-यांना मागील वर्षीचा पीक द्या व २०२४-२५ नुसार सोयाबीन हमी भावाने खरेदी सुरू करा, यांसह विविध मागण्यांचे निवेदन रयत क्रांती संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदारामार्फत देण्यात आले.  मागील २०२३-२४ चा पिक विमा अद्याप मिळाला नसल्यामुळे पात्र शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर अद्याप २०२४-२५ नुसार सोयाबीन हमी भावाने खरेदी सुरु झाली नाही. त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होत असून त्यात अग्रीमही मिळाला नसल्याने शेतक-यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून यांकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात अनेक महसूल मंडळ दुष्काळ जाहीर करुनही काही मंडाळाला २५ टक्के अग्रीम देण्यात आली व बाकीच्या मंडळाला अजिबात विमा देण्यात आला नाही. तो देण्यात यावा, मागील तीन महिन्यापासून सोयाबीनचे भाव हमी भावा पेक्षा ६०० ते ७०० रुपयानी कमी भावाने शेतक-यांंना सोयाबीन बाजारात विकावे लागत आहे म्हणून चालू २०२४-२५ मध्ये सोयाबीन हमी भावाने सरकारने खरेदी सुरू  करावी, मागील वर्षीच पिकविमा देण्यात यावा, या मागण्याचा समावेश आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पेठे व अनेक शेतक-यांंच्या स्वाक्ष-या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR