25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरपुढच्या वर्षी लवकर या घोषणेत'श्री'चे विसर्जन 

पुढच्या वर्षी लवकर या घोषणेत’श्री’चे विसर्जन 

निलंगा :  प्रतिनिधी
श्री निळकंठेश्वर सार्वजनिक गणेश मंडळ पहिला मानाचा गणपती म्हणून ओळख असणा-या या चांदीच्या गणपतीची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. सतीश होनमाने या युवकाने सेक्सोफोन या वाद्यांवर देशभक्तीपर गीत सादर केले. नगरपालिकेच्या स्वागत कक्षासमोर येताच मान्यवरांच्या हस्ते श्री चे पूजन करण्यात आले.
मंचावर उपविभागीय अधिकारी शरद झाडके, पोलीस उपाधीक्षक डॉ.नितीन कटेकर, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अविनाश रेशमे, माजी नगराध्यक्ष विजयकुमार पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष बरमदे, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड वीरभद्र स्वामी, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, माजी उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, सं.गा.यो. चे अध्यक्ष शेषेराव ममाळे, मराठा सकल मोर्चाचे ईश्वर पाटील, माजी सभापती अशोक शेटकार, माजी सभापती शरद पेटकर, माजी सभापती ंिपटू पाटील, रिपाइंचे अंकुश ढेरे हे उपस्थित होते. यावेळी वीर हनुमान गणेश मंडळ दापका वेस या मंडळांतील युवक युतीने ढोल पथकाद्वारे कला सादर केली, सावता माळी सार्वजनिक गणेश मंडळ याने पारंपारिक वाद्यावर नृत्य सादर केले. वक्रतुंड गणेश मंडळ गांधीनगर या गणेश मंडळांनी बदलापूर घटनेचा निषेध करीत महिलांना सुरक्षा हवी असा देखावा सादर केला. तर मराठ्याना ओबीसी मधून आरक्षण मिळालेच पाहिजे असे मनोज जरांगे पाटील यांचे सूचक बॅनर गणेश मूर्ती समोर लावण्यात आली होते.
मांगीरा गणेश मंडळ मथुरा नगर या मंडळांनी हे वतन- तेरा जलवा, ये देश है वीर जवानो का, रंग दे बसंती, मा तुझे सलाम या गाण्यावर नृत्य सादर केले. विश्वकर्मा गणेश मंडळ पांचाळ कॉलनी या गणेश मंडळांनी येथील वृंदावन येथील प्रेम मंदिराची कलाकृती साकारली होती व ही कलाकृती सर्वांचे आकर्षण ठरले, जय ंिहद गणेश मंडळ जुने पोलीस ठाणे निलंगा यांनी आकर्षक मूर्ती व ढोल ताशाच्या गजरावर युवकांनी नृत्याचा फेर धरला. शेवटी रत्नदीप गणेश मंडळ याने जागेवरच विसर्जन करून स्वर्गवासी प्रा.दयानंद चोपणे यांना श्रद्धांजली वाहिली तर शेवटी गणेश आरती करून राष्ट्रगीताने विसर्जनाची सांगता झाली. यावेळी नगरपरिषद तर्फे श्री विसर्जनाची सोय करण्यात आली होती, निलंगा पोलीस ठाणे अंतर्गत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सूत्रसंचलन मुख्याध्यापक दत्ता शाहीर, रजनीकांत कांबळे, गोंिवद इंगळे यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR