पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील १७ नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या एकूण ३९८ जागांसाठी २६७१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत तसेच १७ नगराध्यक्ष पदासाठी १९३ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.दि २१ नोव्हेंबर पर्यत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे.त्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यात एकूण १४ नगरपालिका आणि ३ पंचायत समिति आहेत.
यावर्षी नव्याने तीन पंचायत समिति तयार झाल्या असून त्याची निवडणूक होणार आहे.त्यामध्ये उरुळी देवाची,माळेगाव आणि मंचर यांचा समावेश आहे. नगर पालिका आणि नगर पंचायतीसाठी येत्या दि २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ रोजी मतमोजणी होणार आहे.
एकूण १४नगरपालिकांमध्ये,इंदापूर,दौड,शिरूर,सासवड,जेजूरी,जुन्नर,आळंदी,चाकण राजगुरूनगर भोर बारामती,लोणावळा,तळेगाव दाभांडे,आणि फुरर्सुंगी उरळी देवाची याचा समावेश आहे बारामती नगर पालिकेसाठी सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तसेच नगरध्यक्ष पदासाठी २२ आणि ४१ जागांसाठी २९८ अर्ज दाखल झाले आहेत.

