24.6 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्रपुणे मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात

पुणे मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात

पुणे : पुण्यातला समाधान चौकामध्ये एक धक्कादायक घटना घडली असून एक अख्खा ट्रक खड्डयामध्ये गेला आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नसली तरी संपूर्ण ट्रक खड्ड्यात गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारात मैलापाणी वाहिनी दुरूस्तीसाठी गेलेला ट्रक अचानक २५ फुट खड्डा पडून त्यामध्ये गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना शुक्रवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. बेलबाग चौकाजवळच सिटी पोस्ट कार्यालय आहे. या परिसरात मैलापाणी वाहिन्यांबाबत तक्रारी आल्याने महापालिकेकडून संबंधित वाहिन्या दुरूस्तीचे काम सुरू होते.

शुक्रवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास महापालिकेची मैलापाणी वाहिनी दुरूस्तीसाठी ठेकेदाराचा ट्रक व कामगार सिटी पोस्ट कार्यालयात पोचले. त्यांनी तेथील चेंबरमध्ये काम करण्यास सुरवात केली. त्याचवेळी ट्रक थांबलेल्या ठिकाणची जमीन खचली, काही वेळातच ट्रक खाली मोठा खड्डा तयार होऊन, त्यामध्ये ट्रक जमीनीत खेचला गेला, ट्रकचा केबीनचा भाग वगळता संपूर्ण ट्रक जमीनीत गाडला गेला.

चालकाने ट्रकमधून बाहेर उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला. ट्रक खड्ड्यात गेल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात पाणी साठू लागले. याबाबतची माहिती अग्निशामक दलास मिळाली. त्यानंतर काही वेळातच अग्निशामक दलाचे जवान तेथे दाखल झाले. त्यांनी खड्ड्यात अडकलेला ट्रक काढण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी सुहास जाधव यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR