30.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रपुणे शहरातील अनोखी लग्नपत्रिका व्हायरल

पुणे शहरातील अनोखी लग्नपत्रिका व्हायरल

पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाकडून सार्वजनिक ठिकाणी मतदार जगजागृतीसाठी मोहीम सुरू केली आहे. विविध माध्यमांतून लोकांना मतदानासाठी जागृत केले जात आहे. त्याचवेळी सामाजिक संघटनांकडून जागृती केली जात आहे. पुणे शहर यासंदर्भात वेगळे ठरले आहे. पुणेकरांनी मतदानासाठी अनोखी लग्नपत्रिका केली आहे. ती व्हायरल झाली आहे. १३ मे च्या लग्नासाठी १८ वर्षेपूर्ण झालेल्या भारतीय नागरिकाला या माध्यमातून मतदानाचे आमंत्रण दिले गेले आहे.

पुण्यात सध्या एक विवाह निमंत्रण पत्रिका चर्चेचा विषय ठरली आहे. चि. मतदार आणि चि. सौ. कां. लोकशाही यांच्या लग्नाची ही पत्रिका आहे. १३ मे च्या पुणे लोकसभेच्या मतदानाला येण्यासाठी ही निमंत्रण पत्रिका आहे. मतदान करण्याचे आवाहन या पत्रिकेतून करण्यात आले आहे. लग्नपत्रिकेत मतदार वर असून लोकशाही वधू आहे. मतदार हा भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव आहे. लोकशाही ही भारतीय संविधानाची ज्येष्ठ कन्या आहे. या दोघांचा शुभविवाह १३ मे रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ५ या शुभमुहूर्तावर होणार आहे.

असे केले आवाहन
लोकसभा २०२४ च्या निमित्ताने भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी, उज्ज्वल भारताची स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपले एक पाऊल, आपला आवाज संसदेत पाठविण्यासाठी आपल्या एक, एक मतदानरूपी आशीर्वाद देऊन हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा, हे अगत्याचे निमंत्रण दिले आहे.

या अनोख्या लग्नाचे निमंत्रण आम्ही भारताचे लोक यांनी दिले आहे. आपले मतदान हाच आमचा आहेर अन् विकसित भारत हेच तुमचे रिटर्न गिफ्ट असणार आहे, असे या पत्रिकेत म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR