परभणी : प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी निर्वाचित डॉ. कांताराव पोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नियुक्तीपत्र संस्थेचे सचिव कृष्णा भैया शिवाजीराव दळणर व डॉ. विठ्ठल डूमनर यांच्या हस्ते देण्यात आले.
श्रमजीवी समाज कल्याण मंडळ संचलित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील प्राचार्यपदासाठी मुलाखती झाल्या. या मुलाखतीत अनेकांनी अर्ज केला. त्यापैकी त्यांची निवड नियमानुसार करण्यात आली. बाभळगाव येथील कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालयात २५ वर्षांपासून ते कार्यरत होते.
त्यांचा राज्यशास्त्र हा विषय आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख ते आ. अमितभैय्या देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केले आहे. त्यांची व्याख्याते म्हणूनही ओळख आहे. जवळपास ४० संशोधन पेपर आहेत. यात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य पातळीवरील समावेश आहे. त्यांची एकूण तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.