35.5 C
Latur
Monday, March 24, 2025
Homeलातूरपुण्याचा सुहास घोडके महा-वीर किताबाचा मानकरी

पुण्याचा सुहास घोडके महा-वीर किताबाचा मानकरी

लातूर : प्रतिनिधी
पुणे येथील सुहास घोडके आणि कुर्डूवाडीचा प्रमोद सुळ यांच्यात लातूर तालुक्­यातील मौजे रामेश्­वर येथे झालेल्­या चुरशीच्या लढतीत सुहास घोडके यांने ५-० अंकाने महाराष्ट्र कुस्ती महा-वीर हा खुल्या गटातील किताब मिळविला. रुपये सव्­वा लाख रोख, चांदीची गदा, सुवर्णपदक व प्रशस्तीपत्रक देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, पुरातन यज्ञभूमी रामेश्वर (रुई) ग्रामस्थ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा रामेश्वर (रुई) येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धा गेल्या १८ वर्षापासून भरविण्यात येत आहेत. प्रतिवर्षाप्रामणे याही वर्षी २१ मार्च शुक्रवार रोजी मोठया उत्­साहाच्­या वातावरणात कुस्­त्­यांची दंगल झाली. या कुस्­ती स्पर्धेत राज्­यभरातून २०० पेक्षा अधिक मल्लांनी भाग घेतला होता.
पुणे येथील सुहास घोडके आणि कुर्डूवाडीचा प्रमोद सुळ यांच्यात शेवटची अत्­यंत चुरशीची लढत झाली यात सुहास घोडके यांने ५-० अंकाने विजय मिळवत महाराष्ट्र कुस्ती महा-वीर हा खुल्या गटातील किताब मिळविला. त्­यांचा सव्­वा लाख रोख, चांदीची गदा, सुवर्णपदक व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. तर प्रमोद सुळ यांनी उपविजेते पद मिळविले. त्यांना रौप्यपदक व रोख रुपये १ लाखाचे पारितोषिक देण्यात आले. जामखेड येथील सागर मोहोळकर यांला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. त्याला रुपये ५० हजार रोख व कांस्य पदक देण्यात आले. चतुर्थ क्रमांकावर सोलापूर येथील कालीचरण सोलणकर याला २५ हजार रूपये रोख व पदक देण्यात आले.
हिंद केसरी दीनानाथ सिंग, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, रामेश्वरचे माजी सरपंच तुळशीराम कराड, काशीराम कराड, आ. रमेश  कराड, डॉ. हनुमंत कराड, राजेश कराड, ऋषिकेश कराड, प्रा. विलास कथुरे यांच्या हस्ते विजेत्या मल्लांना पारितोषिक देण्यात आले.
या वेळी जालना येथील मंठा गावातील पैलवान वैष्णवी रामकिसण सोळंके हिने १५ मिनीटात अद्वितीय योगासनाचे प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. बाबा निम्हण यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन व धावते वर्णन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR