29.9 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम आजाराचा शिरकाव

पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम आजाराचा शिरकाव

पुणे : प्रतिनिधी
पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम नावाच्या दुर्मिळ आजाराचे २२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण दीनानाथ मंगेशकर आणि पूना हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. येथे नमुन्यांची तपासणी सुरू आहे. पुणे महानगरपालिकेने बाधित भागात टीम पाठवली आहे. जीबीएसचे निदान आणि उपचार गुंतागुंतीचे आहेत, तरी बहुतेक रुग्ण बरे होतात.

दरम्यान, पुणे शहरात सध्या एका दुर्मिळ आजाराचे अनेक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या २२ संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी इंडियन मेडिकल कॉन्सिल ऑफ रिसर्च येथे पाठवण्यात आले आहेत. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि पूना हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काही रुग्णांना दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ आजार आहे. दरवर्षी १ लाख लोकांमध्ये तो एका व्यक्तीला होतो. चेतासंस्थेच्या चाचण्या आणि स्पायनल फ्लुईड चाचण्या या आजाराच्या निदानासाठी आवश्यक असतात. आयव्हीआयजी अथवा प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या उपचारांमुळे रुग्णाला लवकरात लवकर मदत मिळू शकते. या आजाराचे बहुतेक रुग्ण बरे होत असले, तरी २० टक्के रुग्णांना सहा महिन्यांनंतरही हालचालींमध्ये अडचणी येतात, अशी माहिती समोर आली आहे.

जीबीएस या आजाराचे पहिले लक्षण म्हणजे अशक्तपणा आणि हातापायांना मुंग्या येणे. या आजाराचे नेमके कारण काय ते सध्या माहीत नाही. गुइलेन बॅरे सिंड्रोमची कारणे पूर्णपणे समजून घेणे वैद्यकीय शास्त्रासाठी अजूनही एक आव्हान आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR