18.1 C
Latur
Monday, January 6, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात ग्रंथालयामध्ये आग; पुस्तकांचे मोठे नुकसान

पुण्यात ग्रंथालयामध्ये आग; पुस्तकांचे मोठे नुकसान

पुणे : पुण्यामध्ये आगीच्या घटना वाढल्या आहेत. शहरातील मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या ग्रंथालयाला आग लागली असून यामध्ये पुस्तकांचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रंथालयातील पुस्तके आगीमध्ये खाक झाली असून यामुळे वाचकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

पुण्यातील नवी पेठमध्ये गांजवे चौकाजवळ ही आग लागली आहे. या परिसरामध्ये अनेक स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी वाचन आणि अभ्यास करत असतात. यातील ध्रुवतारा अभ्यासिकेला आग लागली. तिस-या मजल्यावर असलेल्या या ग्रंथालयाला आग लागली. सकाळी ७ वाजता अग्निशमन दलाला याबाबत वर्दी आली.

घटनेची माहिती कळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाकडून चार वाहने आणि दोन वॉटर टँकर दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाकडून अर्ध्या तासामध्ये आगीवर नियंत्रण आणण्यात आले. या आगीमध्ये पुस्तके, कपाटं आणि ग्रंथालयातील कॉम्प्युटर यांचे नुकसान झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR