निष्पक्ष तपासासाठी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवा

मुंबई : (प्रतिनिधी)
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास निष्पक्षपणे व्हावा, तपासावर कोणाचाही दबाव येऊ नये यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांना मंत्रिपदावरून हटवावे, अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन केली. छत्रपती संभाजी राजे यांच्यासह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, ज्योती मेटे, भाजपा आमदार सुरेश धस, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आ.संदीप क्षीरसागर आदी नेते शिष्टमंडळात सहभागी झाले होते. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून दूर करावे हीच सर्वांची मागणी होती. या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार असल्याचे सुरेश धस यांनी सांगितले.

हे प्रकरण जातपात आणि राजकारणाच्या पलीकडचे आहे. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या होऊनही योग्य न्याय मिळाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा घटना घडतील. त्यामुळेच आम्ही राज्यपालांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली असून, चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांना पदावरून दूर करावे अशी आमची मागणी असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांबरोबरच भाजपा आमदार सुरेश धस यांनीही हे प्रकरण लावून धरले आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वांनी लावून धरली असून, याचसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली. बीडमध्ये खंडणी, अपहरण आणि इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढलं आहे. सरपंच संतोष देशमुख प्रकरण हे बीडमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे उदाहरण असल्याचे शिष्टमंडळाने राज्यपालांना सांगितलं. पोलिसांच्या कथित निष्काळजीपणा आणि पक्षपातीपणामुळे बीड जिल्ह्यात अशांतता पसरली आहे.

राज्यभरातील सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे, असे शिष्टमंडळाने राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले संतोष देशमुख, तसेच परभणीचे सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्यादेखील गंभीर आहे. सरकार मुंडे आणि कराडला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. एसआयटीमधील चौकशी अधिकारी आरोपींच्या जवळचे आहेत. सरकार ऐकत नाही म्हणून राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी सविस्तर मागणी ऐकली असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.

राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांनाही भेटणार : धस
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तपासावर परिणाम होऊ नये म्हणून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना बिनखात्याचे मंत्रिपद द्यावे. जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत मुंडे यांनी पदावर राहू नये, अशी आमची भूमिका असून, यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचे आ.सुरेश धस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस हे स्वत: गृहमंत्री आहेत. त्यांना सगळं माहीत आहे. वाल्मिक कराड म्हणजे “गँग्स ऑफ वासेपूर” आहेत. वंजारी समाजाच्या ९० टक्के लोकांनाही त्यांची दहशत मान्य नाही. या गँग्स ऑफ वासेपूरचा त्रास वंजारी मुकादमांनाही झाला आहे. त्यामुळे वंजारी समाजाचे मुकादम त्रासलेले आहेत. कारखान्याकडून खंडणीच्या टक्केवारीची सुपारी घेऊन वंजारी समाजाच्या मुकादमांनाही याचा त्रास झाला असल्याचे सुरेश धस म्हणाले.

काय आहेत मागण्या?
– सरपंच संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे हे हस्तक्षेप करू शकतात. त्यामुळे त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, असे शिष्टमंडळानं राज्यपालांना सांगितले. कायदा आणि सुव्यवस्था असलेले राज्य आहे, अशी भावना बळकट करावी, अशी मागणी शिष्टमंडळानं राज्यपालांकडे केली.

– अपहरण, खंडणी आण हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याच्यावर बीएनएस १०३ (जुना आयपीसी ३०२) अन्वये तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल करून खटला जलदगती न्यायालयात चालवावा.
– कायद्याची अंमलबजावणी करणा-या अधिका-यांची जबाबदारी सुनिश्चित करावी. कर्तव्यात कसूर करणा-या पोलिसांवर कारवाई करावी.

– बीड जिल्ह्यातील जनतेचा विश्वास, सुरक्षितता पूर्ववत करण्याकरिता तसेच खंडणी आणि गुंडगिरीला आळा घालण्यासाठी राज्यपालांनी पुढाकार घ्यावा.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|पाऊस गायब, पिकं वाळली अन् बैलपोळाही फिका! लातूरच्या शेतकऱ्यांची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा
04:49
Video thumbnail
Nanded Accident|नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघात! 6 ठार, 8 गंभीर जखमी
00:46
Video thumbnail
Nanded|बैल पोळ्यातही मराठा आरक्षणाची धग! बैलांच्या पाठीवर लिहिले आरक्षणाचे नारे
00:43
Video thumbnail
Latur|स्कॉर्पियो पेटवली अन् आरोपी फरार! कव्हा नाका परिसरात खळबळ
00:42
Video thumbnail
Latur|मराठा आरक्षणासाठी मसलगा येथे मराठा समाजबांधव आक्रमक
01:31
Video thumbnail
Dharashiv|डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक; माडजमध्ये बैलपोळ्याचा उत्साह
01:06
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणासाठी टाकीवर आंदोलन; हदगाव तालुक्यात नेमकं काय घडलं?
00:31
Video thumbnail
Nanded|मनोज जरांगे यांच्याबद्दल कॉमेंट करणाऱ्या नायब तहसीलदाराला कारणे दाखवा नोटीस
00:46
Video thumbnail
Latur Police|लातूरमध्ये हेल्मेट सक्तीचा धडाका! 7 दिवसांत तब्बल 5,799 केसेस
02:13
Video thumbnail
Latur|लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जिल्हाधिकाऱ्यांना साकडं
04:24
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27

Latest news