27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ

पुण्यात डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ

पुणे : प्रतिनिधी
पुण्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. शहरामध्ये गेल्या महिनाभरात डेंग्यूचे ४९२ संशयित रुग्ण आणि चिकनगुनियाच्या २६१ रुग्णांची नोंद झाली आहे. चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये काही वेगळी लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार, पुणे शहरामध्ये ६ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या एक महिन्याच्या काळात डेंग्यूचे ४९२ संशयित रुग्ण आढळले. यापैकी ३० रुग्णांना डेंग्यू झाला आहे. गेल्या वर्षभरात डेंग्यूचे ४ हजार ५६ संशयित रुग्ण सापडले आहेत.

त्यातील ३२४ जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे. तर महिनाभरात चिकनगुनियाचे २६१ रुग्ण आढळल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे शहरातील चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या ३४७ वर पोहोचली आहे. डासांमुळे पसरत असलेल्या आजारांचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे महापालिका उपाययोजना करत आहे. शहरामध्ये डास प्रतिबंधक औषधे फवारली जात आहेत.

पुण्यात हवामानात वारंवार बदल होत आहेत. त्यामुळे डासांचं प्रमाण वाढलं आहे. परिणामी हिवताप, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण वाढायला लागले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR