31 C
Latur
Sunday, February 2, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात पहिला मराठी भाषिक नकाशा तयार

पुण्यात पहिला मराठी भाषिक नकाशा तयार

पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये बोलण्यात येणा-या भाषेचा आणि तिच्या वैशिष्ट्यांचा डिजिटल संग्रह तयार करण्याच्या उद्देशाने डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ आणि राज्य मराठी विकास संस्थेने मराठी बोलींचे सर्वेक्षण केले असून, त्यातून पहिला मराठी भाषिक नकाशा तयार केला आहे.

विश्व मराठी संमेलनाच्या व्यासपीठावर प्रकल्प प्रमुख डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी यांनी या सर्वेक्षणाची वैशिष्ट्ये आणि मराठी भाषिक नकाशाचे सादरीकरण केले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, त्याच वर्षी होणा-या विश्व मराठी संमेलनात मराठी बोलींचे सर्वेक्षण आणि पहिला मराठी भाषिक नकाशा सादर करण्याची संधी ही आनंदाची बाब आहे, असे नमूद करत डॉ. सोनल कुलकर्णी यांनी सर्वेक्षणाची माहिती सांगितली.

डेक्कन कॉलेजचा भाषाशास्त्र विभाग आणि राज्य मराठी विकास संस्थेने २०१७ ते २०२३ या कालावधीत राज्यातील ३४ जिल्ह्यांतील २७७ गावांमध्ये सर्व वयोगट-स्तरांतील नागरिकांच्या मुलाखती घेऊन ‘बोलींचे सर्वेक्षण – प्रतिमांकन व आलेखन’ हा प्रकल्प पूर्ण केला. त्यातून मराठीचा पहिला भाषिक नकाशा तयार झाला आहे.

मराठी भाषेतील भौगोलिक विविधतेचा भाषा वैज्ञानिक अभ्यासासाठी उपयुक्त असा डिजिटल डेटाबेस तयार करणे आणि बोलीतील फरक निश्चित करण्यासाठी निवडक शब्द-व्याकरणाच्या अनुषंगाने विश्लेषण करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. शब्द, ध्वनि, व्याकरण आणि प्रादेशिक स्तरावर भेद दर्शविणारे हे विश्लेषण व नकाशे उपलब्ध आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR