पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वडगाव शेरी परिसरात वार्षिक यात्रा सुरू असताना टोळक्याने मध्यरात्री वाहनांची तोडफोड केली आहे. तोडफोडीमुळे मात्र, येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास टोळके कुरकुटे हॉस्पिटलजवळच्या गल्लीत शिरले. त्यांनी त्यांच्याकडील लाकडी दांडक्याने मोठमोठ्याने शिवीगाळ करून वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली.
टोळक्याने दोन रिक्षा, तसेच दहा ते बारा दुचाकींची तोडफोड केली. तोडफोडीनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पळालेल्या आरोपींना पकडण्यात आले आहे.