पुणे : प्रतिनिधी
पुण्यात धावत्या स्कूल बसमध्ये बसचालकाने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील वानवडीत घडलेल्या या घटनेप्रकरणी ४५ वर्षांच्या बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वानवडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास केला जात आहे. बदलापूर प्रकरणानंतर पुण्यात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बसचालक सहा वर्षे चिमुकलीसह तिच्या मैत्रिणीवर गेल्या चार दिवसांपासून लैंगिक अत्याचार करत होता. आरोपी हा एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना बसमधून शाळेत सोडण्याचे काम करतो. या आरोपीच्या बसमध्ये दोन्ही पीडित चिमुकल्या मुली पुढच्या सीटवर बसत होत्या.
आरोपी दोन्ही चिमुकल्या मुलींसोबत बसून त्यांच्यासोबत लैंगिक चाळे करत होता. तसेच याची वाच्यता कुठे केली तर धमकीसुद्धा देत असल्याचे पीडित मुलींनी सांगितले आहे. अल्पवयीन चिमुकली घरी आल्यानंतर तिला प्रायव्हेट पार्टला वेदना होत होत्या. यानंतर मुलीच्या आईने याची विचारपूस केल्यानंतर चिमुकलीने घडलेला प्रकार सांगितला.
बापाकडून मुलीवर वर्षभर लैंगिक अत्याचार
पुण्यातील वारजे परिसरात राहणा-या एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवरच तब्बल एक वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. शाळेतील गुड टच, बॅट टच उपक्रमातून हा गंभीर प्रकार उघडकीस आला असून नराधम बापाला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पंकज देवेंद्र ठाकूर (वय ३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा बिहारचा राहणारा आहे. मागच्या १ वर्षापासून तो मुलीला चक्क अश्लील व्हीडीओ दाखवत लैंगिक अत्याचार करत होता. आरोपीच्या मोबाईलमध्ये असे अश्लील व्हीडीओ देखील आढळले असल्याची माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे.