22.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात ‘हार्टफुलनेस रन’चे आयोजन

पुण्यात ‘हार्टफुलनेस रन’चे आयोजन

पुणे : प्रतिनिधी
ग्रॅन्यूल्स ग्रीन हार्टफुलनेस रन या जागतिक उपक्रमाचे आयोजन १ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजता पुण्यात होणार आहे. वाघोली येथील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल येथे सुरू होणारी आणि नगर रोडवरून परत येणारी ही स्पर्धा हार्टफुलनेस संस्थेने युवक व क्रीडा मंत्रालय व फिट इंडिया मूव्हमेंट यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. जिचा उद्देश शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य वाढवणे तसेच पर्यावरणीय शाश्वतता टिकवणे हा आहे.

या रनमध्ये सहभागी होणा-यांना १ कि.मी., ३ कि.मी., ५ कि.मी. व १० कि.मी. या श्रेणीमध्ये सहभागी होण्याचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच, या उपक्रमातून जमा होणा-या निधीचा उपयोग १०,००० झाडे लावण्यासाठी करण्यात येईल. या मॅरेथॉनला डॉ. जगन्नाथ दीक्षित, डायबेटीस रिव्हर्सल तज्ज्ञ आणि प्रीती मस्के, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.
एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी, अदर पूनावाला ग्रुप, जी. एच. रायसोनी कॉलेज, अ‍ॅडव्हेंचर आयआयटी, गिरिराज ज्वेलर्स आणि आयव्ही इस्टेट या नामांकित संस्थांनी या अभिनव उपक्रमाला पाठिंबा दर्शविला आहे.

हार्टफुलनेसने २०२० पासून २० लाखांहून अधिक झाडे लावली आहेत आणि ८० हून अधिक दुर्मिळ प्रजातींचे संवर्धन केले आहे. या उपक्रमामुळे १,०२७ एकर जमीन पुनर्जीवित झाली आहे आणि २५,००० टन कार्बन उत्सर्जनाचा समतोल राखण्यात यश आले आहे. त्यामुळे या हरित आणि आरोग्यदायी उपक्रमाचा भाग बनण्यासाठी greenheartfulnessrun.com येथे त्वरित नोंदणी करा,असे आवाहनही त्यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR