31.6 C
Latur
Saturday, April 12, 2025
Homeमनोरंजनपुन्हा प्रेमात पडली नताशा?

पुन्हा प्रेमात पडली नताशा?

मुंबई : वृत्तसंस्था
अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टँकोविक हिचा भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या याच्याशी जुलै २०२४ मध्ये घटस्फोट झाला होता. २०२० मध्ये दोघे लग्न बंधनात अडकले होते मात्र दोघांचं लग्न हे केवळ ४ वर्षेच टिकलं. हार्दिक आणि नताशाला अगस्त्य नावाचा मुलगा असून घटस्फोटानंतरही दोघे मिळून त्याचा सांभाळ करतात. नताशा स्टँकोविक ही तिच्या एका इन्स्टाग्राम स्टोरीमुळे चर्चेत आली आहे. यात तिने ती पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे सांगितले.

अभिनेत्री नताशा स्टँकोविक हिने काहीच दिवसांपूर्वी मुलाखतीतून आपण घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात पडण्यास तयार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर नताशाने बुधवारी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. यात लिहिले की, ‘पुन्हा प्रेमात पडल्यावर चांगले वाटते’. तसेच तिने एका ऑफिशियल इन्स्टाग्राम आयडीला सुद्धा टॅग केले. नताशाच्या या पोस्टमुळे ती पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची चर्चा रंगली आहे.

नताशाने ‘पुन्हा प्रेमात पडल्यावर चांगले वाटते’ या आशयाची पोस्ट टॅग केले आहे. आता हे अकाऊंट नेमकं कोणाचंय याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे.

काही दिवसांपूर्वी असेसुद्धा म्हटले जात होते की हे अकाऊंट अभिनेता रणबीर कपूरचे आहे आणि तो लवकरच इन्स्टाग्रामवर येणार आहे. सेलिब्रिटींकडून अशा पोस्ट करून त्याची लॉन्चिंग करण्यात येत आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR