इस्लामाबाद : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात मुसळधार पाऊस पडत आहे. पंजाब प्रांतात आलेल्या पुरामुळे १० लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले. प्रांतीय आपत्ती प्राधिकरणाने सांगितले की, मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. पंजाबमध्ये १.६७ लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले. ४० हजारांनी स्वेच्छेने घरं सोडली. ८०२ लोकांचा मृत्यू झाला. पिकं उद्ध्वस्त झाली, रस्ते बंद झाले. चिनाब नदीला पूर आला आहे. भारताने काश्मीरमधील धरणातून पाणी सोडलं, ज्यामुळे पुराचा इशारा दिला.
मुसळधार पावसामुळे पाकिस्तानमध्ये १० लाख लोक विस्थापित झाले, तर भारताने इशारा देऊन मदत केली. पाकिस्तानने यासाठी भारताला दोष दिला, परंतु हा मान्सूनचा एक भाग आहे. लाहोर आणि इतर शहरं पाण्याखाली आहेत. पाकिस्तानने वाळूच्या पिशव्या टाकल्या, पण पाण्याने त्या वाहून गेल्या. २०२२ मध्ये आलेल्या पुराची आठवण करून देणारा हा पूर आहे.
पाकिस्तानमध्ये गुडघ्यापर्यंत चिखल असलेला पाहायला मिळत आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये पाकिस्तानी रेंजर्स गुडघ्यापर्यंत पाण्यात उभे असल्याचं दिसून आलं आहे. पाकिस्तानने ग्रँड ट्रंक रोड (जीटी रोड) च्या उंचीला दोष दिला आहे, ज्यामुळे पाणी वाहत आहे आणि त्यांच्या बाजूला साचत आहे असं म्हटलं. परंतु सत्य हे आहे की, भारताने आधीच पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था आणि चांगले ड्रेनेज व्यवस्थापन लागू केले आहे, ज्यामुळे पाणी साचू शकलं नाही.