लातूर : प्रतिनिधी
पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सध्याच्या काळात वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली आहे, ही चिंतेची बाब असून ही कमी करण्यासाठी प्रामुख्याने युवकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आई-वडिलांचा सन्मान या धावपळीच्या युगात होणे आवश्यक असून सुशिक्षित लोकांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणामध्ये नोकरदार आणि व्यवसायिकांच्या पालकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे ही समाजासाठी चिंताजनक बाब आहे. असे मत अॅड. अजय कलशेट्टी व्यक्त केले.
येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ‘युथ फॉर माय भारत आणि युथ फॉर डिजिटल लिटर्सी’ विशेष वार्षिक शिबिरात मौजे जमालपुर येथे दि. ८ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सत्रात कायदेविषयक जनजागृती व बालविवाह प्रतिबंध या विषयावर डॉ. प्रमोद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली अॅड. अजय कलशेट्टी यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी मंचावर अॅड. एस. व्ही. सलगरे, पोलीस निरीक्षक एस. एम. चौडीकर, डॉ. गीता वाघमारे, डॉ. राजाभाऊ पवार, डॉ. केशव आलगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्र संपन्न झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अॅड. एस. व्ही. सलगरे, म्हणाले की जादूटोणा, चमत्कार, याला बळी न पडता, वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेणे काळाची गरज आहे, कर्मकांड जात, धर्म, पंथ, जाणते भोंदूगिरी या गोष्टी मानसिक आजारातून पुढे येत आहेत. त्यासाठी समाजामध्ये कायदेविषयक जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी पोलीस निरीक्षक एस. एम. चौडीकर म्हणाले की, युवकांनी विद्यार्थी असे म्हणतात अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आपल्या व्यक्तिमत्व विकास आणि करिअर कडे लक्ष देण्याची गरज आहे. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. केशव आलगुले, सूत्रसंचालन बालाजी परांडे तर आभार साक्षी जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जाधव रामदास, प्रा. प्रज्ञा कांबळे, संदीप आडे, शितल पवार, खुणे सांची, अविनाश सूर्यवंशी, यांनी परिश्रम घेतले.