22.3 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeपरभणीपुलावरून विद्यार्थी पडला ओढ्याच्या पाण्यात

पुलावरून विद्यार्थी पडला ओढ्याच्या पाण्यात

पूर्णा : शहराजवळील पूर्णा कानखेड रस्त्यावरून एक तेरा वर्षीय शाळकरी विद्यार्थी सायकलवरून शाळेत जात असताना रस्त्यावरील काशी नाल्यावरून ओढ्यात पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने ओढ्याला पाणी कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव वाचला आहे.

पूर्णा ते कानडखेड रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडून पावसाचे पाणी साचले आहे. मागील १० वर्षात या रस्त्याचे काम तीन वेळा जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत करण्यात आले. परंतू रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांची निधी खर्च करून देखील रस्त्याची जैसे थे अवस्था आहे. या रस्त्या अभावी नागरिकांना दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून फेरफटका मारून पूर्णा शहरात यावे लागत असून याचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे.

या रस्त्यावर दि.२४ जून रोजी सकाळी कानडखेड येथून पूर्णा शहराकडे शाळेत येत असलेल्या एक १३ वर्षीय मुलगा कावशी नाल्याच्या पुलावरील खड्ड्यात पाणी साचल्याने सायकलसह ओढ्यात पडला. यावेळी रस्त्यावरून ये जा करणा-या प्रवासी व वाहनधारकांनी लगेच ओढ्यातून विद्यार्थ्याला बाहेर काढले. या बद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित रस्त्याच्या कंत्राटदार व अभियंता याची सखोल चौकशी व रस्ता कामाची मागणी परिसरातील नागरिकांतून पुढे येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR