25.3 C
Latur
Wednesday, June 26, 2024
Homeमनोरंजनपुष्पा २ ची रिलीज पुढे ढकलली, डिसेंबर २०२४ मध्ये होऊ शकतो प्रदर्शित

पुष्पा २ ची रिलीज पुढे ढकलली, डिसेंबर २०२४ मध्ये होऊ शकतो प्रदर्शित

मुंबई : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर २०२१ मध्ये रिलीज झालेल्या पुष्पा: द राइज या चित्रपटाचा दुसरा भाग पुष्पा: द रुल प्रदर्शनापुर्वीच खुप चर्चेत आहे. पुष्पाने प्रेक्षकांना इतके वेड लावले होते की ते पुष्पा २ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांच्या भेटीला हा चित्रपट १५ ऑगस्टला येणार होता. मात्र, त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आता पुष्पा २ ची नवीन रिलीज डेटही समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शूटिंगला उशीर झाल्यामुळे पुष्पा २ चे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. निर्मार्त्यांनी पुष्पा २ ची शुटिंग पुर्ण करून १५ ऑगस्टला या चित्रपटाला प्रदर्शित करण्याची योजना आखली होती, शिवाय तसे जाहीर ही करण्यात आले होते, मात्र काही कारणास्तव चित्रपटाचे प्रदर्शन लंबणीवर पडणार आहे. सुत्रांच्या मते, काल निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून, एक ते दोन दिवसात अधिकृत नवीन तारीख जाहीर केली जाईल.

असा दावा केला जात आहे की अल्लू अर्जुन, सुकुमार आणि निर्माते आता डिसेंबर महिन्यात पुष्पा २ प्रदर्शित करण्याचा विचारात आहेत. सूत्राने सांगितले की, पुष्पा २ ची टीम अनेक तारखांवर विचार करत आहे, ज्यामध्ये दसरा या सणाच्या दिवशी, डिसेंबर २०२४ आणि पोंगल २०२५ दरम्यान थिएटरमध्ये येऊ शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR