27.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमुख्य बातम्यापूजा खेडकरचा पाय खोलात; दिव्यांग प्रमाणपत्र खोटे सिद्ध

पूजा खेडकरचा पाय खोलात; दिव्यांग प्रमाणपत्र खोटे सिद्ध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा पाय दिवसेंदिवस आणखी खोलात जात आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रॅँचकडून पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्रासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला आहे. सादर करण्यात आलेले प्रमाणपत्र खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे.

पूजा खेडकर यांचे दिव्यांग प्रमाणपत्र खोटे असल्याचे दिल्ली पोलीसांच्या अहवालात म्हटले आहे. सिव्हील परीक्षा २०२२-२०२३ दरम्यान पूजा खेडकरने सादर केलेले प्रमाणपत्र खोटे असल्याचे निषपन्न झाले. तसेच पूजा खेडकरने आपल्या प्रमाणपत्रातील नावामध्ये बदल केल्याचेही म्हटले आहे. पूजा खेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे हे प्रमाणपत्र महाराष्ट्राने दिलेले नाही. दिल्ली क्राइम ब्रॅँचने दिल्ली उच्च न्यायालयात यासंदर्भात माहिती दिली आहे.

दोन वेगळी दिव्यांग प्रमाणपत्र : पूजा खेडकर यांच्या दोन दिव्यांग प्रमाणपत्रांचा दिल्ली क्राइम ब्रॅँचने तपास केला. दिव्यांग प्रमाणपत्र अहमदनगर जिल्हा रुग्णालयाने १८ जानेवारी २०२१ ला दिल्याचे लक्षात आले. यातील पहिल्या प्रमाणपत्रात पूजा खेडकरची ४० टक्के दृश्यमानता कमी असून २० टक्के मेंदूचे आजार म्हणजेच मानसिक आजार असल्याचे म्हटले आहे. हे पहिले प्रमाणपत्र पूजा खेडकरने २०२२ मध्ये सादर केले होते.
पूजा खेडकरच्या दुस-या दिव्यांग प्रमाणपत्रानुसार तिच्या उजव्या कानात १० टक्के ऐकण्याची क्षमता, दृश्यमानता ४० टक्के कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. यासोबत आपल्याला सांध्याचा आजार असल्याचे प्रमाणपत्रावेळी सांगण्यात आले आहे. दुसरे प्रमाणपत्र २०२३ ला सादर केले होते.

या सगळ्या प्रमाणपत्राची पडताळणी केली असता दुसरे प्रमाणपत्र हे अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलने दिलेच नव्हते असे समोर आले आहे. त्यामुळे पूजा खेडकरने सादर केलेले दुसरे प्रमाणपत्र बनावट असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पूजा खेडकरचा पाय आणखी खोलात गेल्याचे पाहायला मिळतेय.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR