17.5 C
Latur
Tuesday, November 25, 2025
Homeअंतरराष्ट्रीयपेशावर हादरले : पाकिस्तानी आर्मीवर दहशतवाद्यांचा वार

पेशावर हादरले : पाकिस्तानी आर्मीवर दहशतवाद्यांचा वार

पेशावर : वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या पेशावरमध्ये फ्रंटियर कोरचे मुख्यालय आहे. पॅरा मिलिट्री फोर्सेजचे मुख्य कार्यालय आहे. आज सोमवारी सकाळी पाकिस्तान निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला. फ्रंटियर कोरच्या मुख्यालयात दोन स्फोटांचे आवाज ऐकू आले. पाकिस्तानी सुरक्षापथकांनी हल्ला झालेल्या परिसराला घेराव घालून ऑपरेशन सुरु केलं आहे. फ्रंटियर कोर मुख्यालय परिसरात दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी स्वत:ला स्फोटात उडवून दिले. यात आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाला. पहिल्या आत्मघातकी हल्लेखोराने फ्रंटियर कोरच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्फोट घडवून आणला. दुस-याने आतमध्ये जाऊन स्वत:ला स्फोटात उडवले. जानेवारीपासून आतापर्यंत विभिन्न हल्ल्यात ४३० पेक्षा जास्त लोक मारले गेले. यात बहुतांश सुरक्षा कर्मचारी आहेत.

कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या लष्कराने आणि पोलिसांनी फ्रंटियर कोरच्या मुख्यालय परिसराला घेराव घातला आहे. आतमध्ये दहशतवादी घुसले असल्याची शक्यता आहे. पाकिस्तानी लष्करी कॅन्टॉन्मेंट जवळ हे मुख्यालय आहे. हा सर्व वर्दळीचा भाग आहे. ‘वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे. लष्कर आणि पोलिसांनी परिसराला घेराव घातला आहे’ असं या भागातील रहिवाशी सफदर खानने सांगितलं.

याआधी सुद्धा निमलष्करी दलाच्या मुख्यालयाबाहेर हल्ला झाला. या वर्षाच्या सुरुवातीला क्वेटा येथे निमलष्करी दलाच्या कार्यालयाजवळ बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात कमीत कमी १० लोक मारले गेले. अनेक जण जखमी झाले. पाकिस्तानात सध्या तणाव मोठ्या प्रमाणात आहे. ३ सप्टेंबर रोजी क्वेटा येथे एका राजकीय रॅलीमध्ये आत्मघातकी हल्ला झाला. यात ११ लोक मारले गेले. ४० पेक्षा जास्त जखमी झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR