22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रपैनगंगा नदीपात्रात रेती तस्­करांनी खोदलेल्­या खड्ड्यात बुडून तिघींचा मृत्­यू

पैनगंगा नदीपात्रात रेती तस्­करांनी खोदलेल्­या खड्ड्यात बुडून तिघींचा मृत्­यू

वाई बाजार : पूजेतील निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या चुलती व दोन पुतण्यांचा पैनगंगा नदीपात्रात रेतीतस्करांनी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल (शनिवार) दि. १३ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

नदीपात्रातील बेसुमार वाळूउपसा या घटनेस जबाबदार असल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांसह ग्रामस्थांनी तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यावर कारवाईची मागणी केली. जोपर्यंत तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, घटनास्थळावर येणार नाहीत तोपर्यंत मृतदेहांना हात लावू देणार नाही असा पवित्रा घेतल्याने प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहूर तालुक्यातील पडसा गावाच्या नजीक असलेल्या विदर्भातील मैजे कवठा बाजार येथील प्रतीक्षा प्रवीण चौधरी (वय अंदाजे ३५ वर्षे) (काकू) सोबतच कु. अक्षरा निलेश चौधरी (११ वर्षे) व कु. आराध्य निलेश चौधरी (९ वर्षे) हे काल दि. १३ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गावाशेजारी असलेल्या पैनगंगा नदीपात्रात पूजेतील निर्माल्य विसर्जनासाठी गेले होते. दरम्यान वाळूतस्करांकडून खोदलेल्या खड्ड्यात एका चिमुकलीचा तोल जाऊन ती डोहात पडल्याने तिला वाचवण्यासाठी दुसरी मुलगीही डोहात बुडाली. हे पाहून काकूने मदतीसाठी धाव घेतली परंतु त्याही डोहात बुडाल्या.
………

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR