करमाळा : प्रतिनिधी
भैरवनाथ शुगर वतीने चालविण्यात येणाऱ्या भैरवनाथ शिवशक्ती क्रीडा संकुलातील पैलवान अनिल जाधव या पैलवानाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माती राज्य विभागात महाराष्ट्र चॅम्पियनशिप पटकावला आहे.
या निवडीबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक किरण तात्या सावंत यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना बक्षीस दिले.
यावेळी वस्ताद रामभाऊ गायकवाड वजीर तांबोळी राम गोसावी गौरव गुटाळ कृषी सहकारी साई कदम श्रीराम भोसले योगेश भिसे ज्ञानेश्वर निमगिरी आदी पैलवान उपस्थित होते भैरवनाथ शुगर वतीने अत्याधुनिक व्यायाम शाळा कारखाना स्थळावर येथे उभारण्यात आली आहे.या व्यायामशाळेत जवळपास निवासी 50 पैलवान कुस्तीचे धडे घेत आहेत.या क्रीडा संकुलातील अनेक पैलवानांनी महाराष्ट्रातील अनेक कुस्त्यांचे फड गाजवलेले आहेत.
यावेळी बोलताना किरण तात्या साउंड म्हणाले कीमहाराष्ट्राची कुस्तीची परंपरा पुढे चालू ठेवण्याचे काम भैरवनाथ शुगर च्या वतीने सुरू असून या अत्याधुनिक व्यायाम शाळेच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो पैलवान तयार झालेले आहेत.आज अनिल जाधव यांनी महाराष्ट्र चॅम्पियन हा किताब मिळवून भैरवनाथ शुगरच्या शिवशक्ती व्यायाम शाळेचे नाव मोठे केले आहे.