बीड : प्रतिनिधी
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही गौप्यस्फोट केले. अंजली दमानिया यांच्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीदेखील या प्रकरणात उडी घेतली आहे. तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडचे बीड पोलिस दलातील कनेक्शन उघडकीस आणले आहेत.
दरम्यान, बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि इतर आरोपी अटकेत असून सीआयडी आणि बीड पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात तृप्ती देसाईंनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. वाल्मिक कराडवर खंडणी रॅकेट आणि त्याच्या राजकीय वरदहस्त बाबत चर्चा सुरू आहे. वाल्मिक कराड हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जातो.
विरोधकांकडूनही त्यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. असे असतानाच आता भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे.
वाल्मिक कराडचे जाळे बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. तसेच, त्याचे निकटवर्तीय आणि मर्जीतील पोलिस अधिकारी मोठ्या प्रमाणावर असल्याचा दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे.
त्याचबरोबर देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पारदर्शीपणे करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर तृप्ती देसाई यांनी पोलिस अधिका-यांच्या नावाची यादी जाहीर केली असून, या पोलिसांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणी देखील केली आहे.
तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडच्या मर्जीतील पोलिसांची यादी सोशल मीडियावर शेअर केली आहे, ज्यात कॉन्स्टेबलपासून ते अधिकारी पर्यंतच्या व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी, गृहमंत्रालयाने या पोलिस अधिका-यांची चौकशी करावी, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.
येथील पोलिसांची यादी
बाळराजे दराडे, रंगनाथ जगताप, भागवत शेलार, संजय राठोड,
त्रिंबक चोपने, कागने सतिश, सचिन सानप,राजाभाऊ ओताडे,
बांगर बाबासाहेब, विष्णु फड, , प्रविण बांगर, अमोल गायकवाड,(युसुफ वडगाव) राजकुमार मुंडे,
शेख जमिर, चोवले, रवि केंद्रे,
बापु राऊत, केंद्रे भास्कर, दिलीप गित्ते,
, भताने गोविंद, विलास खरात,बाला डाकने,