30.8 C
Latur
Tuesday, April 22, 2025
Homeलातूरपोलिस ठाणे स्तरावर मिनी सायबर सेल स्थापन 

पोलिस ठाणे स्तरावर मिनी सायबर सेल स्थापन 

लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या सायबर पोलीस ठाण्याच्या वतीने लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या स्तरावर मिनी सायबर सेल स्थापन करुन त्यांना सायबर कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील ४२ पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.  इतर जिल्ह्यांप्रमाणे लातूर जिल्ह्यातही सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या सायबर गु्न्हेगारीस रोखण्याकरीता योग्य पद्धतीने तपास करणे, सायबर पोर्टलवरील तक्रारींची निर्गती करणे तसेच लातूर जिल्ह्यातील जनतेला सायबर जनजागृती अभियान राबवून सायबर साक्षर करणे.  या उद्देशाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेश व अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या वतीने दि. २१ एप्रिल रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांच्यासाठी सायबर प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात
 आली.
यावेळी जिल्ह्यातील पोलीस उपविभागीय कार्यालये व पोलीस ठाण्यांतील ४२ अधिकारी व अंमलदार यांना एनसीसीआर पोर्टलची कार्यपद्धती, तक्रारींची निर्गतली, सायबर गुन्ह्यांच्या तपसाची कार्यपद्धती या बाबत या कार्यशाळेत सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक बबिता वाकडकर यांनी पीपीटीएससह सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पोलीस हवालदार नळेगावकर व महिला पोलीस हवालदार सुजाता कसपटे यांनी एनसीसीआरपी या सायबर पोर्टलची कार्यपद्धती याचे प्रात्यक्षिक दिले. यासाठी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष देवडे, पतंगे, सुडे, माळी, साठे, गायकवाड, आलापूरे, सोळूंके यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR