30.3 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeलातूरपोलिस ठाण्यामध्ये पडून असलेल्या ८३८ वाहनांची निर्गती

पोलिस ठाण्यामध्ये पडून असलेल्या ८३८ वाहनांची निर्गती

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील ८३८ वाहनापैकी ३६४ वाहने मूळ मालकास परत तर ४७४ वाहनांचा लिलाव करण्यात आला असून तब्बल १७ लाख ३७ हजार रुपयांचा महसूल शासनास जमा करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, लातूर जिल् Þातील पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली, तसेच बेवारस वाहनाचा खच अनेक वर्षापासून पोलिस ठाण्यात साचला होता. विविध गुन्ह्यांतील कारवाई दरम्यान वाहने जप्त करण्यात आली होती. वाहनांच्या मालकी हक्क अथवा घेऊन जाण्याबाबत कोणी संपर्क साधला नसल्याने अनेक वाहने पोलिस ठाण्याच्या आवारात बेवारस स्थितीत पडून होती अशा वाहनांची अक्षरश: दाटी झाली होती. महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखडा सात कलमी कार्यक्रम अंतर्गत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी पोलीस ठाण्यात बेवारसरीत्या पडून असलेल्या ८३८ वाहनाच्या मालकांचा शोध घेऊन त्यांना ते परत देण्याचे व मालकी हक्क सिद्ध न झालेल्या बेवारस वाहनांचा  लिलाव करण्यासंदर्भात पोलीस ठाणे प्रभारी अधिका-यांना मार्गदर्शन व सूचना केल्या होत्या.
लातूर जिल्ह्यातील २३ पोलीस ठाणे अंतर्गत एकूण ८३८ वाहने त्या त्या पोलीस स्टेशनला पडून होती. संबंधित पोलीस ठाणे कडून या वाहनांच्या मालकी हक्काबाबत पोलिस विभागाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे संपर्क साधून वाहनचालकांचे नाव आणि पत्ता मिळवीत १२१ वाहने मूळ मालकास परत केली असून विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले
२४३ वाहने मा. न्यायालयाच्या आदेशान्वये मूळ मालकास परत करण्यात आली आहे. तर मालकी हक्क सिद्ध न करता आलेले ४७४ बेवारस  वाहनांचा लिलाव करण्यात आला.
सदरची लिलाव प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे तालुका तहसीलदार व कमिटी यांच्या उपस्थितीत पोलीस स्टेशनला पार पडली. ४७४ वाहनाच्या लिलावांमधून १७ लाख ३७ हजार ४०० रुपये जमा झाले असून ते शासनास जमा करण्यात आले आहे.  पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनांचा लिलाव व मूळ मालकास वाहने परत दिल्याने अनेक वर्षांपासून ठाण्यात पडून असलेल्या बेवारस वाहनामुळे जागेची समस्या निर्माण झाली होती. बेवारस वाहनांचा लिलाव,  मालकी हक्क सिद्ध केल्याने तसेच न्यायालयाच्या आदेशान्वये वाहने मूळ मालकास परत दिल्याने या समस्येवर तोडगा निघाला आहे आणि पोलीस ठाण्यात जागा उपलब्ध झाली आहे. वाहनांचा लिलाव करण्यासाठी, पोलीस प्रशासनाने वर्तमानपत्रातून आणि पत्र पाठवून मालकांना सूचना देऊन वाहने परत करण्यात आली तर उर्वरित बेवारस वाहनांचा लिलाव करण्यात आला.
एकंदरीत पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये विविध गुन्ह्यामध्ये जप्त केलेले तसेच बेवारस वाहने मोठ्या प्रमाणात पडून असल्याने पोलीस ठाण्यात जागेची कमतरता भासत होती. तसेच अनेक अडचणी निर्माण होत होत्या. पोलीस अधीक्षक समय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात लातूर पोलिसांनी सदरच्या वाहनांच्या मालकाचा शोध घेऊन ते त्यांना परत केली असून मालकी हक्क सिद्ध न केलेल्या वाहनांचा
लिलाव करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR