32.2 C
Latur
Tuesday, April 29, 2025
Homeलातूर‘पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह’साठी लातूरच्या ७ जणांची निवड

‘पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह’साठी लातूरच्या ७ जणांची निवड

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पोलिस विभागात विविध प्रवर्गात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल पोलिस अधिकारी, अंमलदारांना राष्ट्रपती पदक, शौय पदक तसेच पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह, बोधचिन्ह देऊन गौरविले जाते. त्याआनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्­ला यांनी लातूर जिल्ह्यातील सात पोलीस अधिकारी व अमलदारांची सन्मानचिन्ह पदाकसाठी निवड केली आहे.
यामध्ये मनीष मधुकरराव कल्याणकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर, रामदास साहेबराव मिसाळ राखीव पोलीस निरीक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव लातूर, शेख युसुफ इब्राहिम पोलीस उपनिरीक्षक जिल्हा विशेष शाखा लातूर, विलास संतराम फुलारी  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पोलीस ठाणे लातूर, कीर्ती मधुकर दोरवे मोटार परिवहन विभाग लातूर, सचिन शेषराव मुंडे चालक पोलिस अमलदार स्थानिक गुन्हे शाखा लातूर, गणेश पांडुरंग दळवे पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव लातूर यांचा समावेश आहे.  पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह पदक पटकावलेल्या पोलीस अधिकारी व अमलदार यांना  महाराष्ट्र दिन १ मे रोजी सदर सन्मानचिन्हाचे वितरण होणार असून नमूद पोलीस अधिकारी व अंमलदारांनी त्यांच्या सेवेत केलेल्या विशेष कामगिरीबद्दल सदरचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR