27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरप्रख्यात गायक राहुल देशपांडे यांचे उद्या गायन 

प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांचे उद्या गायन 

लातूर : प्रतिनिधी
दिवाळीच्या उत्साहात स्वरांची अनुभूती मिळवण्यासाठी विलास को.ऑपरेटीव्ह बँकेच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रख्यात भारतीय शास्त्रीय संगीत गायक राहुल देशपांडे आपल्या सुरेल आवाजाने कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. हा दिवाळी पहाट कार्यक्रम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर उद्या दि. २ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.४५ वाजता हा रंगणार आहे.
या मैफलीत नाट्यसंगीत, भावगीत, अभंग, आणि ‘अलबेला सजन’सारख्या शास्त्रीय बंदिशींचा सुरेल अनुभव लातूरकरांना घेता येणार आहे.  हा संगीतसोहळा, पारंपरिक शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून दिवाळीच्या आनंदाला सुरेल स्पर्श देणार आहे. पारंपरिक भारतीय शास्त्रीय संगीताचे स्वर लातूरकरांसाठी एक अविस्मरणीय अनुभव देणार आहेत. विलास सहकारी बँकेच्या वतीने लातूरकरांसाठी दिवाळी  पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने ही
एक खास संगीत पर्वणी असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR