21.5 C
Latur
Friday, August 29, 2025
Homeलातूरप्रजापिता ब्रह्माकुमारी राजयोग केंद्राच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना निमंत्रण

प्रजापिता ब्रह्माकुमारी राजयोग केंद्राच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना निमंत्रण

लातूर : प्रतिनिधी
प्रजापती ब्रह्माकुमारी राजयोग केंद्राच्या वतीने लातूर येथे होणा-या रक्तदान शिबिरासाठी केंद्राच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या आशियाना निवासस्थानी केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी नंदा दीदी व केंद्राच्या उपसंचालिका  ब्रह्माकुमारी पुण्या दिदी व रोटरी क्लबचे रविशंकर हिंगने यांनी भेट घेवुन आयोजीत  करण्यात आलेल्या २२, २३ ऑगस्ट रोजी लातूर शहरात रक्तदान शिबिरासाठी उद्घाटक म्हणून उपस्थित राहावे, अशी विनंती केली आहे.
तसेच यावेळी रक्षाबंधन निमित्ताने राजयोग केंद्राच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना राखी बांधण्यात आली.  यावेळी लातूर केंद्राच्या संचालिका ब्रम्हा कुमारी नंदा दिदी यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना केंद्राच्या वतीने विविध चालु असलेल्या कार्यक्रमांची माहिती  दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR