36.4 C
Latur
Tuesday, April 29, 2025
Homeक्रीडाप्रतिका रावलचा वनडेत पराक्रम

प्रतिका रावलचा वनडेत पराक्रम

सर्वांत जलद ५०० धावा करणारी महिला क्रिकेटपटू

मुंबई : प्रतिनिधी
मंगळवार, २९ एप्रिल रोजी त्रिकोणीय सामन्यांच्या मालिकेतील दुस-या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची फलंदाज प्रतिका रावलने इतिहास रचला आहे. वनडे क्रिकेटमध्ये सलग पाचव्या वेळा तिने ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
ती दुसरी महिला भारतीय क्रिकेटर बनली आहे, जिने वनडे क्रिकेटमध्ये सलग पाच वेळा अर्धशतक झळकावले आहे. प्रतिकाने वनडेमध्ये ५०० धावा करून एक मोठा विक्रम तिच्या नावावर केला आहे.

प्रतिका रावलने स्मृती मानधनासोबत मिळून ८३ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर स्मृती ५४ चेंडंत ३६ धावा करून बाद झाली. प्रतिका रावलने तिच्या वनडे करिअरच्या ५०० धावा पूर्ण करून इतिहास रचला.

प्रतिका रावलने या शानदार पारीमध्ये आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये ५०० धावा पूर्ण केल्या. ती सर्वांत वेगाने ५०० धावा करणारी महिला खेळाडू ठरली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात सुद्धा प्रतिकाने ६२ चेंडूंत नाबाद ५० धावांची पारी खेळली होती, यासाठी तिला ‘सामनावीर’ हा पुरस्कार देण्यात आला होता. त्या सामन्यात भारताने ९ विकेट्सनी विजय मिळवला होता. प्रतिकाने ८ डावांत ५०० धावा पूर्ण केल्या आहेत. साऊथ आफ्रिकाविरुद्ध प्रतिका रावलने ९१ चेंडूंत ७८ धावा केल्या, या दरम्यान तिने एक षटकार आणि सात चौकार झळकावले.

या मालिकेआधी तिने तीन अर्धशतकं आयर्लंडविरुद्ध राजकोटच्या मैदानावर झळकावली होते. प्रतिका रावलने आयर्लंड महिला संघाविरुद्ध १५ जानेवारी २०२५ रोजी १५४ धावांची रेकॉर्ड पारी खेळली होती. त्याआधी पहिल्या दोन सामन्यांत तिने ८९ आणि ६७ धावा केल्या होत्या. २७ एप्रिलपासून सुरू झालेल्या या मालिकेचा अंतिम सामना ११ मे रोजी खेळला जाणार आहे. सर्व संघ बाकीच्या दोन संघांशी दोन-दोन सामने खेळतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR