21.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeलातूरप्रति पंढरपूर वांजरवाडा येथे गोंिवंद माऊली मंदिरात गर्दी

प्रति पंढरपूर वांजरवाडा येथे गोंिवंद माऊली मंदिरात गर्दी

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथे श्री संत गोंिवंद माऊलींचे देवस्थान आहे. हे मंदिर प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. आषाढी एकादशी निमित्त वांजरवाडा येथील या मंदिरामध्ये दर्शनासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती.  दिवसभरात हजारो भाविकांनी श्री संत गोंिवद माऊलींचे दर्शन घेतले.  दर्शनासाठी दोन तास एवढा कालावधी लागला. या ठिकाणी दापका येथील संत नामदेव महाराज दापकेकर यांच्या ंिदंडीचे आगमन वांजरवाडा येथे मोठ्या उत्साहात झाले. दिवसभर मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जळकोट, कंधार, मुखेड, अहमदपूर आदी तालुक्यातील भक्तांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आलेला सर्व भक्तांसाठी चहा व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.  संत गोंिवंद माऊली मंदिर समितीच्या वतीने तसेच समस्त ग्रामस्थांच्या वतीने भाविकांना कुठलीही अडचण येऊ नये याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच दर्शनाप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांनी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR