36.3 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeराष्ट्रीयप्रत्यक्ष कर संकलन २१.८८ लाख कोटींवर

प्रत्यक्ष कर संकलन २१.८८ लाख कोटींवर

नवी दिल्ली : देशाचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत वार्षिक तुलनेत १९ टक्क्यांनी वाढून २१.८८ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केले.
परताव्यापूर्वी एकूण प्रत्यक्ष कर संकलन या कालावधीत १९.०६ टक्क्यांनी वाढून २०.६४ लाख कोटी रुपये झाले आहे, जे मागील वर्षाच्या याच कालावधीपर्यंत १८.३८ लाख कोटी रुपये होते. यंदा वैयक्तिक प्राप्तिकर संकलनासह कंपनी कर संकलन आणि रोखे व्यवहार कर अर्थात सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसटीटी) संकलन वाढवल्याने एकूण कर महसूल वाढला असल्याचे अर्थमंत्रालयाने सांगितले. वैयक्तिक प्राप्तिकर संकलन १० फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध तपशिलानुसार ११.२८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीपर्यंत ते ९.३० लाख कोटी रुपये होते. कंपन्यांकडून होणा-या कर संकलनातदेखील मोठी वाढ झाली आहे. ते १० फेब्रुवारीपर्यंत १०.०८ लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ते ८.७४ लाख कोटी रुपये होते.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR