लातूर : प्रतिनिधी
निरीक्षण, प्रयोग, निष्कर्ष व उपयोजन हे विज्ञानाचे सुत्र आहे. या माध्यमातून आपण सर्व प्रश्न सोडवू शकतो. त्यामुळेच प्रत्येक प्रश्न सोडविण्याचे सामर्थ्य विज्ञानात असते, असे मत गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांनी व्यक्त केले. पंचायत समिती लातूर व यशवंत विद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी भालके बोलत होते. यावेळी शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, डॉ. गीतांजली पाटील, सदस्य स्वप्नील मनाळे, गटशिक्षणाधिकारी संजय पंचगले, उपशिक्षणाधिकारी पवार, उदगीरचे गट शिक्षणाधिकारी शेख, शिक्षण विस्तार अधिकारी धनराज गीते, चंद्रहंस म्हेत्रे, दिलीप हैबतपूरे, रविंद्र पाटील, मुख्याध्यापीका डॉ. सुवर्णा जाधव, पर्यवेक्षक दयानंद कांबळे, वनिता अकनगिरे यांची उपस्थिती होती.
दीप प्रज्वलीत करुन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. यावेळी पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन डॉ. नरसिंग वाघमोडे यांनी केले. दयानंद कांबळे यांनी आभार मानले. केंद्रस्तरावरुन निवड झालेल्या एकुण ८४ प्रयोगांची मांडणी या प्रदर्शनात करण्यात आलेली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महावीर काळे, एनसीसीचे सर्व कॅडेटस्, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.